
इस्राएल-अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यू वृत्तानंतर कश्मीर खोऱ्यात निदर्शने होण्याची शक्यता असल्याने श्रीनगरच्या अनेक भागांत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलली आहेत.
श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौक परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून, सुरक्षा दलांनी घंटाघर (क्लॉक टॉवर) कडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. आंदोलक या ठिकाणी जमा होऊ नयेत आणि निदर्शने करू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून कश्मीर खोऱ्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था आज आणि उद्या, असे दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन कश्मीर विद्यापीठानेही आपल्या सुरू असलेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
दरम्यान, इराणमधील व्हिडिओ आणि निदर्शनांची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. त्यामुळे शांतता राखण्यासाठी संपूर्ण कश्मीर खोऱ्यात मोबाईल इंटरनेटचा वेग मर्यादित (Speed Restricted) करण्यात आला आहे. अनेक संवेदनशील भागांत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले आहे की, ‘जे लोक खोमनी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आहेत, त्यांना शांततेने शोक करू दिला पाहिजे. जम्मू-कश्मीरमधील जनतेला शांततापूर्ण पद्धतीने दुःख व्यक्त करण्याची मुभा मिळेल याची खात्री आपण केली पाहिजे. पोलीस आणि नागरी प्रशासनाने अत्यंत संयम बाळगावा आणि बळाचा वापर किंवा अनावश्यक निर्बंध लादणे टाळावे’.
परदेशात असलेल्या रहिवाशांच्या सुरक्षिततेबद्दल सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले, ‘इराणमध्ये असलेल्या आपल्या रहिवाशांचे हित आणि कल्याण जपण्यासाठी जम्मू-कश्मीर सरकार परराष्ट्र मंत्रालयाशी सतत संपर्कात आहे’.
kashmir restrictions lal chowk sealed schools closed protest khamenei death
restrictions imposed in srinagar and lal chowk sealed following protests over iranian leader khamenei’s death. schools closed for two days in kashmir valley. latest updates on saamana.
Keywords: saamana, samana, samna, daily saamana, दैनिक सामना, सामना, kashmir news, srinagar restrictions, lal chowk sealed, ali khamenei death protests, omar abdullah kashmir, kashmir schools closed news.



























































