
ICC T20 World Cup 2026 च्या सुपर 8 चा थरार सुरू असतानात इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाचा भडका उडाला. त्यामुळे हिंदुस्थानातून पुन्हा मायदेशी परतणाऱ्या संघांची धाकधुक वाढली असून नुकतीच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या झिम्बाब्वेचा संघ हिंदुस्थानात अडकला आहे. दुबईच्या दिशेने जाणार विमान वाहतूक प्रभावित झाल्यामुळे झिम्बाब्वेला सध्या आणखी काही दिवस हिंदुस्थानात जाता येणार नसल्याचे चित्र आहे.
कर्णधार सिकंदर रजाच्या नेतृत्वात झिम्बाब्वेने टी20 वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली आणि ऑस्ट्रेलियासह श्रीलंकेचा पराभव करत सुपर 8 मध्ये एन्ट्री मारली. परंतू सुपर 8 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. त्यामुळे संघ आपल्या नियोजीत वेळेत मायदेशी परतण्याच्या तयारीत होता. झिम्बाब्वेचे खेळाडू दिल्लीहून वेगवेगळ्या विमानांनी दुबई मार्गे झिम्बाब्वेला जाणार होते. मात्र, इराण-इस्रायल यांच्यात युद्धाचा भडका उडाल्याने त्यांना दुबई विमानतळाहून उड्डान घेणाऱ्या विमानांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. त्यामुळे झिम्बाब्वेला पुढील सुचना येईपर्यंत हिंदुस्थानातच राहावं लागणार आहे.
झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन सॅमस्न यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, “सध्याची परिस्थिती पाहता संघाचा झिम्बाब्वेच्या दिशेने होणारा प्रवास पुढे ढकलण्यात आला आहे. झिम्बाब्वेचे अनेक खेळाडू कनेक्टिंक विमानाने दुबईमार्गे आपला पुढचा प्रवास करणार होते, मात्र आता ते शक्य नाही.” असं मुख्य प्रशिक्षक म्हणाले. यासंदर्भात ICC नेही या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला सुरक्षितरित्या त्यांच्या त्यांच्या देशामध्ये पोहोचवण्यासाठी पर्यायी विमानांची व्यवस्था केली जात आहे.
























































