
विकासाच्या दिखाव्यासाठी पर्यावरणावर घाला घालण्याचे काम सरकार पातळीवर सुरू आहे. याचे गंभीर परिणाम मुंबईकरांना भोगावे लागत आहेत. मागील दीड महिन्यात मुंबई प्रचंड प्रदूषित बनली आहे. बांधकाम प्रकल्पांपासून बाहेर पडणाऱ्या धूलीकणांमुळे प्रदूषण वाढले असतानाच सोमवारी रात्री जागोजागी होळी पेटल्यानंतर हवा ‘अतिघातक’ श्रेणीत पोहोचली. हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) थेट 323 अंकांवर गेला. ही खराब हवा मुंबईकरांना आजारी पाडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईसह आसपासच्या परिसरात प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मागील दोन दिवस वाऱयाचा वेग वाढल्यामुळे प्रदूषणापासून तात्पुरता दिलासा मिळाला होता. मात्र मंगळवारी पुन्हा प्रदूषण मुंबईकरांच्या डोक्यावर बसले. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शहराचा एक्यूआय थेट 323 अंकांवर झेपावला. त्यामुळे हवेची गुणवत्ता ‘अतिघातक’ म्हणून नोंद झाली. एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत एक्यूआय 100 अंकांच्या आसपास होता. त्यानंतर हवेची गुणवत्ता खालावत गेली. एक्यूआयने मध्यरात्री 3 वाजता 411 अंकांची विक्रमी पातळी गाठली आणि नागरिकांची प्रचंड घुसमट झाली. मंगळवारी संपूर्ण दिवसभर प्रदूषित हवेचे धुरके शहर आणि उपनगरांत पसरले होते. उपनगरांच्या तुलनेत दक्षिण मुंबईत धुरक्याचा प्रभाव अधिक होता. बहुमजली इमारती धुरक्यात हरवल्याचे चित्र वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी परिसरात होते. प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात पालिका प्रशासन आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनल्याची प्रतिक्रिया हवामान क्षेत्रातील जाणकारांकडून दिली जात आहे.
काही भागांत एक्यूआय 400 अंकांच्या पुढे
शहराच्या काही भागांतील ‘एक्यूआय’ने कमालीची चिंता वाढवली आहे. कन्नमवार नगरमध्ये 476, सावित्रीबाई फुले नगरमध्ये 401 तसेच मिराशी नगर आणि राजीव गांधी नगर या दोन परिसरांत 379 अंक ‘एक्यूआय’ची नोंद झाली. मंगळवारी अनेक भागांतील एक्यूआय 250 ते 300 अंकादरम्यान नोंद झाला. मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबईच्या अनेक भागांत प्रदूषणाने घातक पातळी गाठल्याचे ‘एक्यूआय डॉट इन’च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
सुमारास शहराचा एक्यूआय थेट 323 अंकांवर झेपावला. त्यामुळे हवेची गुणवत्ता ‘अतिघातक’ म्हणून नोंद झाली. एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत एक्यूआय 100 अंकांच्या आसपास होता. त्यानंतर हवेची गुणवत्ता खालावत गेली. एक्यूआयने मध्यरात्री 3 वाजता 411 अंकांची विक्रमी पातळी गाठली आणि नागरिकांची प्रचंड घुसमट झाली. मंगळवारी संपूर्ण दिवसभर प्रदूषित हवेचे धुरके शहर आणि उपनगरांत पसरले होते. उपनगरांच्या तुलनेत दक्षिण मुंबईत धुरक्याचा प्रभाव अधिक होता. बहुमजली इमारती धुरक्यात हरवल्याचे चित्र वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी परिसरात होते. प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात पालिका प्रशासन आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनल्याची प्रतिक्रिया हवामान क्षेत्रातील जाणकारांकडून दिली जात आहे.
काही भागांत एक्यूआय 400 अंकांच्या पुढे
शहराच्या काही भागांतील ‘एक्यूआय’ने कमालीची चिंता वाढवली आहे. कन्नमवार नगरमध्ये 476, सावित्रीबाई फुले नगरमध्ये 401 तसेच मिराशी नगर आणि राजीव गांधी नगर या दोन परिसरांत 379 अंक ‘एक्यूआय’ची नोंद झाली. मंगळवारी अनेक भागांतील एक्यूआय 250 ते 300 अंकादरम्यान नोंद झाला.
लहान मुले, वृद्ध, रुग्णांची दमछाक
‘अतिघातक’ प्रदूषणाने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची प्रचंड दमछाक केली आहे. घातक श्रेणीतील प्रदूषण दीर्घकाळ ‘जैसे थे’ राहिल्यास श्वसनविकार आणि हृदयरोगाने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी ही धोक्याची घंटा आहे, असे आरोग्यतज्ञांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ञांनी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याची विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. वृद्धांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जात आहे.




























































