
हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू अखेर सुरक्षितपणे मायदेशात परतली. इराणच्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ती दोन दिवस दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकली होती. सिंधू बर्मिंगहॅम येथे होणाऱया ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाली होती, मात्र दुबईहून असलेली कनेक्टिंग फ्लाइट रद्द झाल्याने सिंधू तेथेच अडकून पडली होती.
30 वर्षीय सिंधूंनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत विमानतळावरील परिस्थितीची माहिती दिली होती. मोठय़ा संख्येने प्रवासी अडकले असून भीतीचे वातावरण असल्याचे तिने सांगितले होते. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती.
























































