स्वस्त आयफोन 17 ई लाँच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅपल कंपनीने आयफोन चाहत्यांसाठी स्वस्तात मस्त आयफोन 17 ई लाँच केला आहे. हा फोन आयफोन 17 सीरिजमधील सर्वात स्वस्त फोन आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 64 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये 256 जीबी बेस स्टोरेज दिला आहे. या फोनची प्री-ऑर्डर 4 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे. तर या फोनचा सेल 11 मार्चपासून सुरू केला जाणार आहे. 512 जीबी स्टोरेज पह्नची किंमत 84 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे.

चार वर्षांनंतर नवी मर्सिडीज लाँच

चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मर्सिडीज बेंजने आपली लग्झरी एमपीव्ही व्ही-क्लास हिंदुस्थानी मार्केटमध्ये पुन्हा लाँच केली. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असलेल्या या कारची सुरुवातीच किंमत 1.40 कोटी रुपये आहे. ही कार हिंदुस्थानी मार्केटमध्ये थेट टोयोटा वेलफायर आणि लेक्सस एलएम यासारख्या लक्झरी एमपीव्ही कारला टक्कर देईल. या कारला हिंदुस्थानातच बनवले जाणार आहे. व्ही-क्लासला पहिल्यांदा 2023 मध्ये ग्लोबली लेवलवर सादर केले होते.