
खासगी सरकारी बँक एचडीएफसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. एटीएममधून यूपीआयचा वापर करून पैसे काढल्यास आता ग्राहकांना चार्ज द्यावा लागणार आहे. येत्या 1 एप्रिल 2026 पासून नवीन नियम लागू होणार आहे. बँकेने म्हटले की, जर कोणताही ग्राहक एटीएममधून यूपीआयचा वापर करून कॅश काढत असेल तर बँकेच्या मंथली फ्री एटीएम देवाण-घेवाणीमध्ये हा व्यवहार मोजला जाईल. फ्री लिमिट संपल्यानंतर बँकेच्या नियमाप्रमाणे ग्राहकांना चार्ज द्यावा लागेल.
एचडीएफसी बँकेच्या बचत खात्यातून कॅश काढण्यासाठी बँक ग्राहकांना महिन्याला पाच ट्रान्झॅक्शन फ्री देते. तर अन्य बँकेच्या ग्राहकांना एचडीएफसी बँकेतून 3 ट्रान्झॅक्शन मोफत आहेत. ही लिमिट संपल्यावर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर 23 रुपये प्लस टॅक्स ग्राहकांना द्यावा लागणार आहे. हे चार्ज केवळ एचडीएफसी बँकेच्या एटीएमचा वापर केल्यावर भरावा लागणार आहे. एचडीएफसी बँकेच्या विदेशातील एटीएमचा वापर करण्यावरही चार्ज द्यावा लागणार आहे.
नॉन मॅनेज्ड सेक्शनसाठी प्रत्येक बॅलेन्स चौकशीसाठी 25 रुपये टॅक्स द्यावा लागेल. प्रत्येक कॅश काढण्यावर 125 रुपये प्लस टॅक्स द्यावा लागेल. मॅनेज्ड सेगमेंटच्या कॅश विड्रॉलवर 110 रुपये प्लस टॅक्स द्यावा लागेल.
या खात्यांवर फ्री ट्रान्झॅक्शन
करंट अकाऊंट, बिज लाइट प्लस, बिज प्रो प्लस, बिज अल्ट्रा प्लस, बिज एलीट प्लस, फ्लेक्सी, प्लस, ऑक्टिव, एसेंट, मॅक्स अॅडवांटेज, मॅक्स, प्रोफेशनल, ईकॉम, अपेक्स, अल्टिमा, फ्लेक्सी, मर्चेंट अॅडवॉन्टेज प्लस करंट अकाऊंट, मर्चेंट अॅडवांटेज करंट अकाऊंट, सुप्रीम करंट अकाऊंट, स्टार्टअप करंट अकाऊंट, स्मार्ट अप मॅक्स, स्मार्ट अप ग्रोथ आणि गीगा करंट अकाऊंट या खात्यांना अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन लागू होईल.



























































