महत्त्वाची बातमी – दोन हजारांची नोट अजूनही बदलता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन हजारांच्या नोटा घरात असतील तर त्या बदलण्याची वेळ अजून गेली नाही. आरबीआयकडून अजून या नोटांसाठी एक मोहीम सुरू आहे. या नोटा जमा करण्यासाठी देशभरात आरबीआयने 19 ठिकाणी कार्यालय उघडली आहेत. या ठिकाणी जाऊन दोन हजारांच्या नोटा बदलता येऊ शकतात. 2 हजारांच्या नोटबंदीनंतर सुरुवातील बँक किंवा एटीएममध्ये जाऊन या नोटा बदलण्याची सुविधा होती. परंतु, आता देशात केवळ 19 ठिकाणी या नोटा बदलता येऊ शकतात.