
लग्नाला सहा वर्ष झाली असून तरी देखील अद्याप आई व्हायचा विचार केला नाही असा प्रश्न एका मराठी अभिनेत्रीला विचारला असता तिने त्यावर स्पष्टपणे मला आई व्हायचं नाही, असे सांगितले आहे. ही अभिनेत्री म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे.
View this post on Instagram
नेहाने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिला आई व्हायचं नसल्याचे म्हटले आहे. ”लग्न झाल्यानंतर सर्व मुलींना जसं वाटतं की आई व्हावं तसं मलाही वाटत होतं. त्यासाठी मी प्रयत्नही केले पण तेव्हा मी गरोदर राहिले नाही. पण त्यानंतर मी तो विषय सोडून दिला. तेव्हाच मी ठरवलं की मला आई व्हायचं नाहीये. पण कदाचित रागात आपण हा निर्णय घेत असून असा विचार करून तेव्हा मी माझे एग्ज फ्रोज केले. पण आता माझा निर्णय झालाय की मला आई व्हायचं नाहीये. नाही घेऊ शकत मी ती जबाबदारी असं नेहाने सांगितलं आहे.
View this post on Instagram
वर्क फ्रंटवर नेहाचा 6 मार्चला तिघी हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.





























































