बोरिवलीत आज ‘हर एक पल का शायर- साहिर’ कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ख्यातनाम कवी-गीतकार साहिर लुधियानवी यांच्या विविधांगी प्रतिभेचा समग्र धांडोळा घेणारा सुरेल कार्यक्रम अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ‘हर एक पल का शायर-साहिर’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. हा कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे नाटय़मंदिर, बोरिवली येथे उद्या रात्री 8.30 वाजता होईल. हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून होत आहे.

या कार्यक्रमात श्रीकांत नारायण, सरिता राजेश, सौम्या वर्मा आणि मुख्तार शाह हे गायक साहिर यांची गीते सादर करून सुवर्णकाळ जागवतील. कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रवीण फाटक यांचे आहे. निवेदन आरती शेट्टी यांचे आहे. ध्वनिव्यवस्था नितीश फणसे यांची आहे. कार्यक्रमाचा आनंद जास्तीत जास्त रसिकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.