अजित दादांचे भव्य स्मारक उभारणार, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देतानाच यंदाचा अर्थसंकल्प त्यांना समर्पित केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या प्रशासनात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार व अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते. त्यांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करडय़ा शिस्तीमुळेच महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळात स्थिर राहिली. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख होती. त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांशी चर्चा करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच त्यांच्या नावे ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

दिव्यांगांच्या विकासासाठी

दिव्यांगाकरिता जिल्हा वार्षिक योजनेंअंतर्गत 1 टक्का निधी राखून ठेवण्याकरिता निकष निश्चित करण्यात येत आहेत. दिव्यांग व्यक्तींना गुणवत्तापूर्ण व्यावसायिक काwशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्यासाठी राज्यात 36 काwशल्य विकास व उद्योजकता विकास पेंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य यापूर्वीच दरमहा 1 हजार 500 वरून 2 हजार 500 रुपये करण्यात आले आहे. दिव्यांगांना शासकीय लाभाच्या सर्व सेवासुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर देण्यासाठी दिव्यांग सहाय्यक संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.