
आरोग्य सेवांचा विस्तार करून ती शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्व नागरिकांना पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे. विशेषज्ञ आरोग्य सेवा आणि संशोधनासाठी परिसंस्था म्हणून मेडिसिटीज स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे.
कर्करोग, मधुमेह व हृदयविकार यासारख्या आजारांचे लवकर निदान करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या सहाय्यातून ग्रामीण भागात दरवर्षी तपासणी मोहीम राबविण्याकरिता 4 हजार 500 कोटी रुपये किमतीची योजना प्रस्तावित आहे.
राज्यात डिजिटल सार्वजनिक आरोग्य परिसंस्था निर्माण करण्यासाठी ‘महाराष्ट्र डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान अभियान’ राबविण्यात येईल. यामुळे रिअल-तंत्रज्ञान टाइम डॅशबोर्डच्या आधारे प्रभावी निर्णयप्रक्रिया आणि सनियंत्रण करणे शक्य अभियान होईल.
सार्वजनिक आरोग्याच्या सर्वकष उन्नतीसाठी एम्स व आयआयएमच्या धर्तीवर उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षण व संशोधनासाठी नागपूर येथे भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या सहकार्याने ‘महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था’ स्थापन करण्यात येईल.
दरे गावात निसर्गोपचार केंद्र
ताणतणाव, जीवनशैलीजन्य आजार, मानसिक आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक पेंद्र आरोग्यसेवांसाठी सातारा जिह्यात दरे परिसरात निसर्गोपचार पेंद्र उभारण्यात येईल. तसेच मुंबई महानगर परिसरात वैदिक ज्ञान व संगीत परंपरेवर आधारित वेलनेसचे उत्कृष्टता पेंद्र विकसित करण्यात येईल.

























































