
सन 2047 पर्यंत पाण्याची लागणारी गरज विचारात घेऊन ग्रामीण व शहरी भागात विहित मानकानुसार पाणी उपलब्धतेची सुनिश्चिती केली जाईल. वैनगंगा-नळगंगा नदीजोड योजनेच्या 94 हजार 968 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. वैतरणा व उल्हास खोऱयातील 54 टीएमसी अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱयात वळविण्याचे प्रस्तावित आहे. दमणगंगा-चैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या 13 हजार 497 कोटी रुपये किमतीच्या कामास मान्यता देण्यात आली आहे. नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या 7 हजार 465 कोटी रुपये किमतीच्या कामास मान्यता देण्यात आली आहे.



























































