
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील पराक्रमी सरदार सिदोजी निंबाळकर, ज्यांचा 1772 ची साल्हेरची लउमराणीची लतसेच अफजलखानाच्या वधापासून शिवरायांच्या जालना स्वारीपर्यंतच्या अनेक मोहिमांमध्ये सहभाग होता. त्यांचा पराक्रम आणि शौर्य पाहूनच शिवरायांनी त्यांना ‘सरलष्कर’ हे पद व सेनापंचसहस्री असा हुद्दा दिला होता. जालना स्वारीनंतर महाराज परतत असताना मुघल फौजांनी त्यांच्यावर संगमनेरजवळ हल्ला केला. अशाप्रसंगी सिदोजी निंबाळकर यांनी मुघल सरदारांना थोपवून धरण्याचा मनसूबा महाराजांना बोलून दाखवला. निवडक सैन्य सिदोजी निंबाळकर यांना देऊन बाकीच्या सैन्यांसह महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांनी त्यांना सुरक्षित अशा पट्टा किल्ल्यावर नेले. सरदार सिदोजी निंबाळकर मोठय़ा शर्थीने लमात्र मुघलांच्या सैन्याला तोंड देत असतानाच सिदोजी निंबाळकर धारातीर्थी पडले. अशा या पराक्रमी सरदार सिदोजी निंबाळकर यांची महाराजांनी पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी समाधी बांधून घेतली. सध्या ही समाधी उपेक्षित अवस्थेत आहे.



























































