
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एआय जनरेटेड युद्धाचा फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करणे आता चांगलेच महागात पडू शकते. जर कोणी असे केले तर त्या युजरचे अकाऊंट 90 दिवसांसाठी बंद केले जाऊ शकते, अशी माहिती एक्सचे प्रोडक्ट हेड निकिता बियर यांनी दिली. तसेच युजरने जर पुन्हा हीच चूक केली तर त्या व्यक्तीचे एक्स अकाऊंट मोनेटाइजेशन प्रोग्रॅममधून बाहेर केले जाईल. सध्या इस्रायल-इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. युद्धाच्या वेळी लोकांना खरी माहिती मिळायला हवी. एक्सने नवीन धोरण स्वीकारले आहे. जर कोणत्याही व्यक्तीने एआय व्हिडीओ बनवला असेल तर त्यावर स्वच्छ आणि दिसेल असे एआय लेबल लावणे गरजेचे आहे.




















































