ट्रेंड – लग्नात चक्क रोबो हातात ट्रे घेऊन सर्व्ह करतो आईस्क्रीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नामध्ये काहीतरी वेगळे करण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. काही लग्नांमध्ये श्रीमंती थाट दिसून येतो. मात्र एक लग्नाची सोशल मीडियावर जोरात चर्चा होत आहे. या लग्नात चक्क एक रोबो पाहुण्यांना आईस्क्रीम वाटप करताना दिसतो. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पांढऱ्या रंगाचा रोबो एका ट्रेमध्ये आईस्क्रीम कप घेऊन पाहुण्याकडे जातो. रोबोला अशी सेवा देताना पाहून लोक आश्चर्यचकित झाल्याचे दिसते, पण त्याच वेळी ते मोठ्या कौतुकाने त्या ट्रेमधील आईस्क्रीम कप उचलतात. हा लग्नसोहळा पंजाबच्या लुधियाना येथील आहे. कारखाने तसेच काही रुग्णालयांमध्ये रोबोचा वापर होत असल्याचे आतापर्यंत पाहिले आहे. मात्र लग्नात वेटर झालेला रोबो लोकांनी पहिल्यांदाच पाहिला आहे. तीन लाखांपेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ पाहण्यात आला असून त्यावर लोकांनी गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.