
तात्काळ पैशांची गरज असल्यास सोन्यावर कर्ज घेणे हा सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे, कारण यामुळे तुमचे दागिने, मौल्यवान ऐवज तुमच्याकडेच राहतो.
जर पैशांची गरज कायमस्वरूपी असेल, कर्जाची परतफेड करणे कठीण असेल किंवा सोन्याच्या किमती खूप जास्त असतील, तरच सोने विकणे योग्य ठरू शकते.
सोने तुमचेच राहते, फक्त तारण म्हणून बँक/संस्थेकडे राहते. इतर पर्सनल लोनच्या तुलनेत सोन्यावर मिळणारे कर्ज स्वस्त असते. खूप कमी वेळात कर्ज मिळते.
सोन्याला भावनिक मूल्य असते. त्यासोबत आपल्या आठवणी जोडलेल्या असात. सोने गहाण ठेवल्याने पिढीजात दागिने परत मिळवता येतात.
गहाण ठेवताना विश्वासार्ह बँक किंवा वित्तीय संस्था निवडा, जेणेकरून सोने सुरक्षित राहील. सोने विकण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासा आणि मूळ बिल सोबत ठेवा.





























































