
काँग्रेस नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडे एकूण 2,860.36 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या उत्पन्नात गेल्या पाच वर्षांमध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. विरोधात अर्ज दाखल करणारे कांटे सायन्ना यांचा अर्ज बाद झाल्यामुळे सिंघवी यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्यासोबतच वेम विरेंद्र रेड्डी यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
सिंघवी यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली आहे. अभिषेक मनु सिंघवी आणि त्यांच्या पत्नीच्या नावे एकत्रितपणे तब्बल 2.869 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात घोषित केलेले आहे. सिंघवी यांच्यावर कोणतेही थकीत कर्ज नाही. गेल्या 5 आर्थिक वर्षांत त्यांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ झाली असून, या काळात एकूण उत्पन्न 1.516 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. वर्ष 2020-21 मध्ये त्यांचे उत्पन्न 158 कोटी रुपये होते, तर 2024-25 या वर्षात त्यांचे उत्पन्न 374 कोटी रुपये एवढे होते. सिंघवी यांच्यासोबतच वेम नरेंद्र रेड्डी यांच्याकडे 41 कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे.

























































