
हिंदुस्थानचा अनुभवी शटलर लक्ष्य सेनला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात त्याला चिनी तायपेईच्या लिन चुन-यी याच्याकडून 15-21, 20-22 असा पराभव पत्करावा लागला.
उपांत्य फेरीत सेनने कॅनडाच्या व्हिक्टर ली याचा 1 तास 37 मिनिटे चाललेल्या लढतीत 21-16, 18-21, 21-15 असा पराभव केला होता. तिसऱया गेमच्या सुरुवातीला पायात गोळे आले तरीही त्याने लढत दिली.
सेनची ऐतिहासिक संधी हुकली
हिंदुस्थानसाठी ही ऐतिहासिक संधी होती. प्रकाश पदुकोन यांनी 1980मध्ये आणि पुलेला गोपीचंद यांनी 2001मध्ये ऑल इंग्लंडचे विजेतेपद पटकावले होते. महिला गटात सायना नेहवाल ही 2015मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. मात्र तिला विजेतेपद मिळवता आले नव्हते. आज लक्ष्य सेन विजयी ठरला असता, तर ऑल इंग्लंडचे विजेतेपद जिंकणारा तो तिसरा हिंदुस्थानी ठरला असता.

























































