
एचडीएफसी बँकेने आपल्या लाखो खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) च्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने सर्व एफडीच्या दरात बदल केले नाहीत. केवळ 3 वर्षे ते 4 वर्षे 7 महिन्यांच्यापेक्षा कमी कालावधींच्या एफडीवरील व्याजदरात 0.10 टक्के म्हणजेच 10 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. यामुळे आता सामान्य ग्राहकांना 6.40 टक्क्यांऐवजी आता 6.50 टक्के व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना 6.90 टक्क्यांऐवजी 7 टक्के व्याज दर मिळेल. या बदलानंतर बँकेच्या एफडीचा दर सामान्य खातेदारांसाठी 2.75 टक्के ते 6.50 टक्क्यांपर्यंत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.25 टक्के ते 7 टक्क्यांपर्यंत आहे.

























































