
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बहुचर्चित सर्वसाधारण सभेला अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या १६ मार्च रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता कल्याणच्या स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर सभागृहात ही सभा पार पडणार आहे. पहिलीच सभा लांबल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नाराजी व्यक्त केली होती. यानंतर प्रशासनाने सभेची तारीख जाहीर केली. या सभेत विषय समिती सदस्यांची निवड होणार आहे.
महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर महापौरांची निवडही झाली होती. मात्र त्यानंतरही सर्वसाधारण सभा होऊ शकली नव्हती. अखेर केडीएमसीचे सचिव किशोर शेळके यांनी सभेची नोटीस काढली आहे. या सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पावर चर्चा, पालिका सदस्यांमधून 16 जणांची स्थायी समिती सदस्य म्हणून नियुक्ती, महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती व झोपडपट्टी पुनर्वसन समितीवर 11 सदस्यांची नियुक्ती, शिक्षण समितीवर 11 सदस्यांची निवड केली जाणार आहे.


























































