
लहान मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, 5 आणि 15 वर्षांनंतर बायोमेट्रिक अपडेट आधार नोंदणी केंद्रावर जाऊन करणे अनिवार्य आहे.
5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना बायोमेट्रिक माहितीशिवाय आधार कार्ड मिळते. यामध्ये पालकांच्या माहितीच्या आधारे आधार तयार केले जाते.
मूल 5 वर्षांचे झाल्यावर त्याचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. यामध्ये मुलाचे बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅनिंग आणि फोटो घेतात. याला बाल आधार अपडेट म्हणतात.
5 ते 15 वर्षांमधील मुलांसाठी ही अद्ययावत प्रक्रिया मोफत आहे. जवळच्या आधार केंद्रावर जा, फॉर्म भरा आणि बायोमेट्रिक्स अपडेट करा.
मुलाचे आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड आणि आवश्यक असल्यास जन्म दाखला. काही शाळांमध्येही यूआयडीएआय बायोमेट्रिक अपडेट करण्याची मोहीम राबवत आहे.




























































