छगन भुजबळ यांना सत्र न्यायालयाचा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाकडून अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासह इतरांना दोषमुक्त करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी करणारा अर्ज विशेष सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. फौजदारी प्रक्रियेत कनिष्ठ न्यायालयाला स्वतःचा निर्णय बदलण्याचा अधिकार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने या वेळी नोंदवले.