निवडणुकीपूर्वी बंगालमध्ये मोठा बदल, आरएन रवी बनले नवे राज्यपाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यातच केंद्राने एक मोठा राजकीय बदल केला आहे. आरएन. रवी यांनी आज पश्चिम बंगालचे नवे राज्यपाल म्हणून अधिकृतपणे शपथ घेतली. कोलकाता येथील राजभवनात आयोजित एका विशेष समारंभात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली.

शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यपाल आर. एन. रवी यांनी पश्चिम बंगालच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे कौतुक केले. “या महान भूमीची सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. राज्याच्या विकासासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी मी कटिबद्ध असेन,” असे ते म्हणाले.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राजभवन आणि राज्य सरकार यांच्यात विविध मुद्द्यांवरून संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर आर. एन. रवी यांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आर. एन. रवी हे यापूर्वी नागालँड आणि तामिळनाडूचे राज्यपाल राहिले असून, त्यांचा प्रशासकीय अनुभव मोठा आहे. आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल सरकार आणि नवे राज्यपाल यांच्यातील समन्वय कसा राहतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.