Iran Isreal War महागाई कंबरडे मोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण युद्धाचा भडका पेटल्यानंतर महागाईत वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर वाढून 3.21 टक्के एवढा नोंदवण्यात आला आहे. जानेवारीच्या तुलनेत त्यात 0.47 टक्क्यांची वाढ झाली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू महाग झाल्यामुळे ही वाढ झालेली आहे. इराण युद्ध लवकर न थांबल्यास कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजीपाला, फळांसह प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढून महागाईत मोठी वाढ होण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. जानेवारीमध्ये किरकोळ महागाईचा दर 2.74 टक्के एवढा होता. फेब्रुवारीमध्ये खाद्यान्न महागाई 2.13 टक्क्यांवरून 3.47 टक्क्यांवर पोहोचली. यात 1.34 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. हॉटेल तसेच रेस्टॉरंटमधील खाणेपिणे महागले आहे. याशिवाय वैयक्तिक वापराच्या वस्तूदेखील महाग झाल्या आहेत.