
भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथील माजी सरपंच महेश पिळणकर हे 7 जानेवारी 2026 पासून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी आठजणांची ‘एसआयटी’ स्थापन केली आहे.
गडहिंग्लज उपविभागाचे उपअधीक्षक रामदास इंगवले यांची एसआयटीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली असून, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, गोरख चौधर, गुन्हे शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक अतीश म्हेत्रे, हवालदार राम कोळी, कॉन्स्टेबल राजू कोरे हे सदस्य असणार आहेत.
7 जानेवारी 2026 पासून बेपत्ता असलेले माजी सरपंच पिळणकर यांचा शोध घेण्याची जबाबदारी एसआयटीकडे दिली आहे. गडहिंग्लज उपविभागाचे अपर पोलीस अधीक्षक तपासाचे पर्यवेक्षण करणार आहेत.



























































