हे करून पहा – रात्री झोप लागत नाही?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शरीराला रात्रीची झोप आणि त्यातून मिळणारी उर्जा गरजेची असते. त्यामुळे जागरणे टाळून पूर्ण झोप घ्यावी.

झोप न लागणे किंवा रात्री वारंवार जाग येणे यामागे शरीरातील मेलाटोनीन आणि सेरोटोनीन या हार्मोन्सची कमतरता कारणीभूत असू शकते.

झोपण्यापूर्वी किमान 2 तास आधी पोषक आहार घेणे आणि चहा-कॉफीसारखे कॅफीनयुक्त पेय पिणे टाळणे.

बदाम, किवी, गरम दूध, अक्रोड, कॅमोमाईल चहा, फॅटी फिश आणि ओट्स यांसारखे काही पदार्थ मेंदूला शांत करतात व नैसर्गिकरित्या झोप येण्यास मदत करतात.