एसटी कर्मचाऱ्यांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कर्मचाऱ्यांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. याबाबत शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी प्रश्न विचारला होता.

आयुष्मान भारत योजना आणि महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना या अंतर्गत पाच लाखापर्यंत सर्वांना मोफत उपचार दिले जातात ते उपचार एसटी कर्मचाऱयांनाही दिले जातात का असा सवाल भास्कर जाधव यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील सर्वच नागरिकांना पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत असल्याचे स्पष्ट केले. त्यामध्ये एसटी कर्मचाऱयांचाही समावेश होतो असेही त्यांनी सांगितले.