मोजताबा खामेनी ‘समलैंगिक’, शिक्षकासोबत होते संबंध; नव्या दाव्याने खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली खिल्ली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्याबाबत अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक धक्कादायक माहिती दिली आहे. मोजतबा खामेनी समलैंगिक (गे) असू शकतात अशी माहिती त्यांनी ट्रम्प यांना दिली आहे. त्यांच्या या धक्कदायक माहितीन जगभरात खळबळ उडाली आहे.

अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी (Intelligence Agencies) दिलेल्या माहितीनुसार, मोजतबा खामेनी यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही गोपनीय पुरावे त्यांच्या हाती लागले असून त्यातून मोजतबा यांचा समलैंगिकतेकडे कल असल्याचे समजते. यात पुराव्यांनुसार मोजतबा यांचे एका शिक्षकासोबत संबंध असल्याचेही समजते असे या गुप्तचर यंत्रणांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले आहे. या बैठकीत जेव्हा अधिकाऱ्यांनी याबाबत ट्रम्प यांना माहिती दिली तेव्हा त्यांना हसू आवरले नाही व त्यांनी मोजतबा यांची खिल्ली उडवली.

इराणमध्ये आतापर्यंत समलैंगिक संबंधांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद होती. असे असताना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मुलगा मोजतबा हेच समलैंगिंक असल्याने त्यांनी कधीच त्यांना आपला उत्तराधिकारी करण्याचा विचार केला नव्हता अशी देखील चर्चा सध्या जगभरात सुरू आहे.

इराणमध्ये समलैंगिकता हा केवळ सामाजिक गुन्हा नसून तो एक ‘धार्मिक गुन्हा’ मानला जातो. यासाठी तिथे अत्यंत कठोर कायदे असून दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. जर हा दावा खरा ठरला तर इराणच्या सत्तासंघर्षात आणि धार्मिक नेतृत्वात मोठी उलथापालथ होऊ शकते.