
सोशल मीडियासाठी काहीतरी वेगळे आणि थ्रिलिंग व्हिडीओ बनवण्याच्या नादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. पूर्व दिल्लीतील न्यू अशोकनगर परिसरात एका 28 वर्षीय तरुणाने व्हिडीओ बनवताना स्वतःच्याच छातीवर लोडेड पिस्तूल ताणली आणि अचानक गोळी सुटल्याने त्याचा मृत्यू झाला. पवन कुमार असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना 16 मार्च रोजी घडली. पवन कुमार हा दल्लुपुरा गावाचा रहिवासी होता. तो आपल्या चुलत भावाच्या, हिमांशूच्या परवानाधारक पिस्तुलासोबत व्हिडीओ बनवत होता. त्याच वेळी पिस्तूलमधून गोळी सुटली.


























































