
वाळा हे एक सुगंधी गवत असून, त्याच्या वाळलेल्या मुळांचा वापर मुख्यत्वे उन्हाळ्यात नैसर्गिक थंडावा मिळवण्यासाठी केला जातो. हे सुगंधी, उष्णताश्मक आणि औषधी गुणधर्मांनी भरलेले आहे. माठातील पाणी थंड करण्यासाठी तसेच सरबत बनवण्यासाठी, तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी आणि सुगंधी तेल आणि अत्तर बनवण्यासाठी वाळाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
- वाळ्यामध्ये शीतलता असल्याने उन्हाळ्यात शरीराचे तापमान तसेच शरीराला थंडावा देण्यासाठी वाळ्याचे पाणी उपयुक्त ठरते.
- उन्हाळ्यात जर पित्ताचा त्रास होत असेल तर, भिजवलेल्या वाळाचे पाणी प्यावे. यामुळे पित्त कमी करण्यास मदत होते.
- वाळ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया सुधारते. तसेच बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.
- वाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म असतात ज्यामुळे शरीरााला अनेक आजारांशी लढण्याची ताकद मिळते
- वाळ्यामध्ये झिंक असल्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो आणि डोळ्यांबाबतीत काही समस्या असतील तर त्या देखील कमी होण्यास मदत होते.
- उन्हाळ्यातील लागणारा थकवा कमी करण्यासाठी वाळाचे सरबत उपयुक्त ठरते.
- उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे शरीराला दुर्घंधी येते. ही दुर्घंधी कमी करण्यासाठी वाळाचा उपयोग होतो. तसेच अत्तर म्हणुन देखील वाळाचा वापर केला जातो.


























































