
आयर्लंडचा अनुभवी सलामीवीर पॉल स्टार्लिंगने टी-20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत संघाला धक्का दिला. देशाचं नेतृत्व करणं अभिमानाची बाब होती, पण आता संघासाठी अधिक चांगलं योगदान देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे स्टार्लिंगने सांगितले. मात्र तो वन डे संघाचा कर्णधार म्हणून कायम राहणार असून पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियात होणाऱया विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यावर त्याचा फोकस असेल. स्टार्ंलगने 48 टी-20 सामन्यांत नेतृत्व करताना आयर्लंडने 20 विजय मिळवले, 26 पराभव पत्करले, तर 2 सामने अनिर्णित राहिले. 2023 मध्ये अॅण्डी बालबर्नीच्या राजीनाम्यानंतर स्टार्ंलगने धुरा सांभाळली आणि त्याच वर्षी पूर्णवेळ कर्णधार झाला. मात्र 2024 आणि 2026 टी-20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडला गट टप्प्यापलीकडे जाता आले नाही आणि त्यानंतरच हा मोठा निर्णय समोर आला.


























































