संकट काळात तरी शासनाने संवेदनशीलता दाखवावी – जयंत पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील अनेक भागांना सध्या अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले आहेत. त्यामुळे अक्षरश: काढणीला आलेली रब्बी पिके आडवी झाली आहेत. अनेक फळबागांचेही नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.

”संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचे, फळबागांचे तसेच काढणीस आलेल्या पिकांचेही नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आणि योग्य ती आर्थिक मदत जाहीर करावी. मदत देताना कोणत्याही प्रकारची अट न ठेवता शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात शासनाने संवेदनशीलता दाखवत त्वरित निर्णय घ्यावा”, अशी मागणी जयंत पाटील यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून केली आहे.