
सध्या सोशल मीडियावर सासू आणि सुनेचा एक भन्नाट डान्स व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ‘नाचू किती नाचू किती पंबर लचकली’ या गाण्यावर सासू-सुनेने सुंदर डान्स केला. aish_ambre या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सासू-सुनांनी केलेल्या स्टेप्स आणि दोघींच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकऱयांचा त्यांच्या पोस्टवर काwतुकाचा वर्षाव होत आहे. ‘आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सासू अशी मिळायला पाहिजे’, ‘जेव्हा सासू-सुनेचे 36 गुण जुळतात तेव्हा’, ‘नवऱयापेक्षा सासूसोबत 36 गुण जुळले’ अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱयांनी त्यांच्या या पोस्टवर केल्या आहेत.



























































