
आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या (MI) गोटात पुन्हा एकदा नेतृत्वावरून वादाची ठिणगी पडली आहे. टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू आर. अश्विनने मुंबई इंडियन्सला हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवण्याचा सल्ला दिला आहे. “मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवला संघाचा कर्णधार बनवण्याची वेळ आली आहे, असे अश्विनने म्हटले आहे.
”सूर्यकुमारने स्वतःला एक सक्षम कर्णधार म्हणून सिद्ध करूनही मुंबई इंडियन्सने त्याला अजून कर्णधारपद दिलेले नाही. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्याला कर्णधारपद दिले पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे देशाला विश्वविजेता बनवणारा कर्णधार संघात उपलब्ध असतो, तेव्हा त्याला सोडून दुसऱ्या खेळाडूकडे नेतृत्व सोपवणे चुकीचे वाटते”, असे आर. अश्विनने सांगितले.
२०२४ च्या हंगामात हार्दिकला कर्णधार बनवल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. आता सूर्याच्या जागतिक यशानंतर ही मागणी अधिक जोर धरू लागली आहे.


























































