
बारामतीमधील अजित पवार यांच्या विमान दुर्घटने प्रकरणी अखेर कर्नाटकमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बंगळुरू येथील शेशाद्रीपुरम पोलीस ठाण्यात ‘झिरो एफआयआर’ दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज विधानसभेत दिली.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 173(1) अंतर्गत ‘झिरो एफआरआर’ म्हणून रोहित पवार यांनी तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई आणि बारामती पोलीस ठाण्यात संपर्क साधला होता. मात्र एफआरआर नोंदवण्यात आला नव्हता. ‘झिरो एफआरआर’ अंतर्गत कुणालाही कुठेही तक्रार दाखल करता येते. त्यामुळे मी शेजारच्या कर्नाटकात जाऊन तक्रार दाखल केल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

























































