टेलिग्राम टास्क ; साडेबारा लाख ‘उडनछ’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

टेलिग्राम टास्कच्या माध्यमातून ऑनलाइन फसवणूक करत साडेबारा लाख ‘उडनछू’ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चार आरोपींना श्रीवर्धन पोलिसांनी नालासोपाऱ्यातून अटक केली आहे. चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

रायगड येथील म्हसळ्यात राहणारे वसंत पोतदार यांची टेलिग्राम टास्कच्या नावाखाली यूपीआय व आरटीजी एसद्वारे फसवणूक करण्यात आली होती. आरोपींनी तब्बल १२ लाख ५३ हजार १५३ रुपयांचा चुना लावला होता. या प्रकरणातील आरोपी रोहित गमरे (४०), रोशन सिंग (२५), अंकित विश्वकर्मा (२३) आणि वृषभ जाधव (२६) यांना नालासोपाऱ्यातून अटक केली आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीने तांत्रिक तपास करत त्यांचे मोबाईल, बँक खाते व पत्त्यांचा मागोवा घेत त्यांना जेरबंद केले.