एका मेसेजने उडवली वाहनचालकांची झोप, विदर्भात पेट्रोल पंपावर लांबच लांब रागा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा हिंदुस्थानवर मोठा परिणाम दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हे युद्ध दिर्घकाळ चालले तर आपल्याला कोरोनासारख्या परिस्थितीसाठी तयार राहावे लागणार आहे असे सांगितले आहे. त्याच दरम्यान विदर्भात एका मेसेजने खळबळ उडाली होती. ट

मंगळवारी रात्री पेट्रोल पंप बंद होणार असल्याचे मेसेज अनेकांना त्यांच्या मोबाईवर मिळाले होते. त्यानंतर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ अमरावती अशा शहरांमध्ये पेट्रोल पंपांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाल्या. अनेकांनी तर आपल्या घरात जेवढ्या बाईक कार आहेत त्यांच्या टाक्या फुल्ल करून घेतल्या आहेत.

मध्य रात्रीनंतरही पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होती. अनेक पेट्रोल पंप हे रात्री बारानंतर बंद होतात. मात्र मोठ्या रांगा लागल्याने पेट्रोल पंप मालकांना देखील पंप बंद करता आले नाहीत.