सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानच उपस्थित नसतील, तर त्याला अर्थ नाही; संजय राऊत संतापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्या बैठकीत त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर भाष्य केले. सर्वपक्षीय बैठक बोलावत त्या बैठकीला पंतप्रधानच उपस्थित नसतील, तर त्या बैठकीला अर्थ नाही, अशा शब्दांत त्यांनी संतात व्यक्त केला.

सध्या जगभरात तणावाचे वातावरण आहे. अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध वाढत आहे. तसेच अमेरिका युद्धसमाप्तीची घोषणा करत आहे. तर इराण त्याचा स्पष्टपणे इन्कार करत आहे. तसेच या युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करणार असल्याचेही वृत्त आहे. या युद्धाचा देशावरही परिणाम झाला असून एलपीजी, डिझेल, पेट्रोल आणि इंधनांच्या किमती वाढत आहे. त्यामुळे महागाई वाढण्याचा धोकाही आहे.

या सर्व परिस्थितीत सरकारने नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, त्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. जर सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानच उपस्थित नसतील ते फक्त त्यांचा प्रतिनिधी पाठवत असतील तर त्याला काहीही अर्थ नाही. आम्ही देखील अशा बैठकीला जाणे टाळायला हवे होते, अशा शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

कोणाचेही खासगी व्हिडीओ काढून ते व्हायरल करत त्यावर चर्चा करणे हे पत्रकारिता आणि राडकारणात योग्य नाही. महाराष्ट्रात राजकारणात राजकीय नेतृत्वाचे, अध्यात्माचे आणि हिंदुत्वाचे अधःपतन गेल्या काही वर्षात भाजपचे सरकार आल्यापासून होत आहे. त्यामुळे या विषयावर कितीवेळा, कोणावर आणि काय बोलायचे, असा प्रश्न आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि काही पक्षांचे नेते ज्यांची नावे या प्रकरणात आली आहे, त्यांनी यावर बोलावे, त्यानंतर आम्ही बोलू,आता या विषयावर बोलणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भोंदू बाबाअशोक खरात प्रकरणी रोज नवनवी माहिती उघड होत आहे. मुख्यमंत्री आणि पोलीस खाते यांना आता शांतपणे काम करू देण्याची गरज आहे. रोज या मुद्द्यावर बोलून इतर महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होता कामा नये. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपास सुरू असताना त्यावर संशय व्यक्त करणे योग्य नाही.