‘एक्स’ अचानक डाऊन, युजर्सकडून तक्रारींचा पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स पुन्हा एकदा तांत्रिक कारणामुळे गुरुवारी दुपारी डाऊन झाले. जगभरातील हजारो युजर्सला समस्यांना तोंड द्यावे लागल्याने युजर्सने अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रारींचा पाऊस पाडला. युजर्सला अ‍ॅपवर एक्स उघडण्यात अडचण येत होती. फीड पाहणे, पोस्ट करणे आणि अन्य फीचर्सपर्यंत युजर्सला अडचणी येत होत्या. अनेक युजर्स आपली टाइमलाइन रिफ्रेश करू शकत नव्हते. कंटेट लोड होत नव्हते. पोस्ट अपलोड करण्यातही युजर्सला अडचण येत होती. काही युजर्सनी तर अ‍ॅपसोबत वेबसाईट व्हर्जनमध्येही समस्या येत असल्याचे म्हटले. अवघ्या काही तासांत हजारो युजर्सनी तक्रारी केल्या. यात 46 टक्के युजर्सला फीड अ‍ॅक्सेस, 34 टक्के युजर्सला अ‍ॅप उघडण्यात अडचण, तर 14 टक्के युजर्सला अडचणी आल्या. काही वेळानंतर एक्स पूर्वपदावर आले.