कर्नाटकात खासगी बस पुलावरून कोसळली, 10 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यात 40 प्रवाशांना घेऊन जाणारी एक खासगी बस पुलावरून खाली कोसळल्याची घटना घडली. या अपघातात दहाहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी भद्रावती तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भद्रावती तालुक्यात असलेल्या वीरपुरा गावातील कागेहल्ला येथे हा अपघात घडला.

अपघातग्रस्त बस दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी येथून भद्रावतीच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. वीरपुरा गावातील कागेहल्लाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलाचे रेलिंग तोडून खाली कोसळली. यात दहाहून अधिक प्रवासी जखमी झाले. भद्रावती ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, सध्या पुढील तपास सुरू आहे.