
सिंगल डोअर फ्रिजमध्ये एक समस्या असते, ती म्हणजे फ्रिजरमध्ये बर्फाचे डोंगर तयार होतात.
बर्फ सहज निघेल त्यासाठी काही टीप्स उपयुक्त ठरतील. सर्वप्रथम फ्रिजचा प्लग काढून ठेवा. उकळलेले पाणी असलेले भांडे फ्रिजरमध्ये काही वेळ ठेवा. त्यामुळे बर्फ वितळेल. फ्रिजर उघडून समोर टेबलफॅन ठेवल्यास बर्फ लवकर वितळतो.
काही वेळ फ्रिज बंद केल्यानंतर बर्फाचा थर हलका होतो. तो प्लॅस्टिकच्या टूलने सहज काढता येईल. चाकू, कात्री अशा लोखंडी वस्तू वापरणे टाळा.

























































