IPL 2026 – शमीचा वेगवान मारा अन् हैदराबादचे ‘धुरंधर’ पत्यांसारखे कोसळले, नकोशा विक्रमाची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 मध्ये राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला (SRH) लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध (LSG) एका लाजिरवाण्या विक्रमाचा सामना करावा लागला. ज्या मैदानात गेल्या हंगामात धावांचा पाऊस पडायचा, तिथेच रविवारी हैदराबादचे फलंदाज एका एका धावेसाठी तरसले. पहिल्या 10 षटकांत केवळ 35 धावा करत हैदराबादचा संघ आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात सुरुवातीच्या 10 षटकांत सर्वात कमी धावा करणारा चौथा संघ ठरला आहे.

हैदराबादच्या या दुरवस्थेला सर्वात जास्त कारणीभूत ठरला तो म्हणजे टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी. हिंदुस्थानच्या संघात पुनरागमनासाठी सज्ज असलेल्या शमीने आपल्या पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अभिषेक शर्माला (0) बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने ट्रॅव्हिस हेडचा (7) काटा काढला. अवघ्या 8 धावांवर दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्याने स्टेडियममधील हजारो चाहत्यांमध्ये शांतता पसरली. त्यानंतर अनकॅप्ड प्रिन्स यादवने इशान किशनला (0) बाद करत हैदराबादची अवस्था 3 बाद 11 अशी दयनीय केली.

वेगवान माऱ्याचा जुना बादशहा! वाढत्या वयाला जेम्स अँडरसनने धुडकावून लावलं, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 56व्यांदा केली धडाकेबाज कामगिरी

इशान किशननंतर लियाम लिविंगस्टोनही स्वस्तात बाद झाला, ज्यामुळे हैदराबादची धावगती एक्सप्रेसऐवजी पॅसेंजर ट्रेनपेक्षाही संथ झाली. इशान, क्लासेन आणि अभिषेक यांसारख्या धडाकेबाज फलंदाजांच्या उपस्थितीतही संघ 10 षटकांत केवळ 35 धावा करू शकला.