
दात घासताना हिरडय़ांतून थोडेसे रक्त येणे आपण अनेकदा किरकोळ समजून दुर्लक्ष करतो. मात्र हिरडय़ांमधून रक्त येणे हा एक ‘सायलेंट अलर्ट’ असू शकतो.
वैद्यकीय तज्ञांच्या मते तुमचे तोंड आरोग्याशी नाही तर हृदय, किडनी आणि शरीरातील जळजळीशी संबंधित असू शकते.
हिरडय़ांमधून रक्त येणे हे जिंजिव्हायटिस आजाराचे लक्षण असते. दातांवर जमा होणार बॅक्टेरियाचा थर हिरडय़ांमध्ये दाह निर्माण करतो.
हिरडय़ांना सूज येते तेव्हा बॅक्टेरिया रक्तात प्रवेश करतात. त्यामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते व दीर्घकाळ जळजळ होऊन त्याचा रक्तवाहिन्यांसह अवयवांवर परिणाम होतो.
हिरडय़ांमधील बॅक्टेरिया रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा करतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. बॅक्टेरियाचे प्रमाण वाढल्याने त्याचा ताण किडनीवर पडतो.




























































