हे करून पहा, घरीच बनवा भट्टीसारखे खारे शेंगदाणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुकरच्या एका शिट्टीत भट्टीसारखे खारे शेंगदाणे तयार करण्याची सोपी आणि भन्नाट ट्रिक लोकप्रिय झाली आहे.

पहिल्या टप्प्यात कुकरमध्ये मिठाच्या पाण्यात कच्चे शेंगदाणे टाका. शेंगदाणे पूर्णपणे बुडतील याची खात्री करा. त्यानंतर कुकरची फक्त एक शिट्टी घ्या. शेंगदाणे जास्त शिजले तर टेक्स्चर खराब होईल.

कुकर थंड झाल्यानंतर शेंगदाणे स्वच्छ, कोरडय़ा कपड्यावर पसरवून हलक्या हाताने पुसावे आणि सुकवावे. त्यानंतर कढईत मीठ घेऊन त्यावर थोडं पाणी शिंपडा. या ओलसर मिठात शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.