
इंधनाच्या आणबाणीचा सामना करण्यासाठी नेपाळ सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्था आठवडय़ातून दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार शनिवार आणि रविवारी नेपाळमध्ये सार्वजनिक सुट्टी असेल. उद्या सुरू होणाऱ्या आठवडय़ापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. दोन दिवसांच्या सुट्टीमुळे इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांत इंधन टंचाईमुळे स्मार्ट लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होमसह अनेक निर्बंध लादले जात आहेत.



























































