
चर्चगेट येथील एका प्रसिद्ध गार्डन मध्ये 55 वर्ष पुरुषाची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. राहुल पंजवानी उर्फ पंजाबी असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.
जनार्दन जाधव हे आझाद मैदान पोलीस ठाण्यात उप निरीक्षक म्हणून काम करतात. शनिवारी ते दिवसपाळीला कर्त्याववर होते. सायंकाळी पोलीस नियंत्रण कक्षातून आझाद मैदान पोलिसांना माहिती कळवण्यात आली. चर्चगेट येथील एका गार्डन जवळ एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. त्या माहितीनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले. घटनास्थळी पोलिसांना राहुल हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी राहुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. राहुलच्या हत्ये मागील कारण स्पष्ट झालेले नाही. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.
व्यावसायिकाच्या घरातून दागिने चोरीला
व्यावसायिकाच्या घरातून दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी तीन नोकरासह एका सोनाराविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे दोन नोकर घरगडी म्हणून कामाला होते. एक नोकर 13 तर दुसरा हा सहा वर्षांपासून कामाला होता. तक्रारदार यांना त्यांच्या लग्नात काही दागिने तर काही वडिलोपार्जित मिळालेले दागिने त्यांनी कपाटात ठेवले होते. सणावाराच्या दिवशी ते दागिने काढत असायचे. ते अनेकदा चावी हे नोकराकडे देत असायचे.




























































