
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यातून प्रसिद्धीच्या झोतात आलेले आयआयटीयन बाबा ऊर्फ अभय सिंह लग्नाच्या बेडीत अडकला. 15 फेब्रुवारी रोजी शिवरात्रीच्या मुहूर्तावर हिमाचलमधील अघंजर मंदिरात लग्न केल्यानंतर 19 फेब्रुवारीला रीतसर कोर्ट मॅरेज केल्याची माहिती स्वतः अभय सिंह यांनी दिली आहे.
अभय सिंह मूळचे झज्जर जिह्यातील सासरौली गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील कर्ण सिंह वकील आहेत. मुंबई आयआयटीमधून एरो स्पेस इंजिनीअरिंग केलेले अभय सिंह प्रयागराज महापुंभात संन्यासी वेशात दिसल्यानंतर देश-विदेशात चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा चर्चेत आले. ज्या मुलीशी लग्न केले तिचे नाव प्रतीका असून ती मूळची कर्नाटकाची असून तीही अभियंता आहे. आम्ही हिमाचलमधील धर्मशाळा येथे राहत आहोत. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात आनंदी आहोत. सध्या साधेपणाने राहत आहोत. आज वडिलांच्या चेंबरमध्ये येऊन खूप आनंद झाला. लग्नानंतर पत्नीने मला येथे आणले. बँकेत केवायसी करायची आहे असे अभय यांनी सांगितले.



























































