
एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कॅम्पबेल विल्सन यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विल्सन यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून कंपनीने नव्या सीईओसाठी शोधमोहीम सुरू केली आहे. कंपनीतर्फे एका निवेदनाद्वारे यासंदर्भात माहिती देण्यात आली. कंपनीने नवीन सीईओची नियुक्ती करण्यासंदर्भात एक समिती नेमली आहे. सप्टेंबर 2022मध्ये एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे आली तेव्हापासून कॅम्पबेल विल्सन हे सीईओ पदावर होते.



























































