
मुंबई महानगरपालिका थोडक्यासाठी हुकली असली तरी मुंबई आपलीच आहे, नगरसेवकांच्या संख्येचा विचार करू नका, मुंबईकरांच्या कल्याणासाठी जिवाचे रान करा, मुंबईच्या विकासासाठी सदैव तत्पर रहा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी या वेळी केले. शिवसेनेच्या नवनिर्वाचित शिलेदारांना त्यांनी महापालिकेची कार्यपद्धती आणि अर्थसंकल्प या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. मुंबई महानगरपालिकेतील सत्ताकाळात तसेच महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीत मुंबईसाठी करण्यात आलेल्या कामांचा लेखाजोखा मांडतानाच हे कार्य अखंडपणे सुरू ठेवा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले. महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण या बाबींना प्राधान्य द्या, असे त्यांनी सांगितले.




























































