
राज्यात नवे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान (आयटी) व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हा एक स्वतंत्र विभागच असणार असून त्यात आयटी क्षेत्रातील उमेदवारांचीच नियुक्ती केली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागा अंतर्गत असलेले माहिती-तंत्रज्ञान कार्यासन वेगळे करून हा विभाग स्थापन करण्यात येणार आहे. तसेच माहिती-तंत्रज्ञान संचालनालयाचे रूपांतर करून नवीन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती-तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालय स्थापन करण्यात येणार आहे. या आयुक्तालयासाठी 77 नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत.

























































